PUNE : संचारबंदीत परदेशात 200 नागरिक अन् इतर जिल्ह्यात 400 जण गेले

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यांसह परदेशात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. परंतु अत्यावश्यक कारण असताना परवानगी दिली जाते. त्यानुसार पुण्यातून तबल 196 नागरिक परदेशात गेले असून इतर जिल्ह्यात जाण्यास 406 नागरिकाना परवानगी देण्यात आली आहे. जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. विमानसेवा सह सर्व वाहतूक बंद आहे. नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी घातली आहे. तर पुण्यात वाहने रस्त्यावर अण्यास देखील बंदी आहे.

दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. याकाळात पोलिसांकडून परावनगी देण्यात येत आहे. त्यासाठी रीतसर माहिती अंडी योग्य कारण दिल्यानंतर पोलीस त्यांना प्रवासाचा परवाना देत आहेत. पुण्यात शिक्षण आणि नोकरी यासाठी अनेक परदेशातील नागरिक आहेत. दरम्यान लॉकडाऊन झाल्यानंतर इतरांप्रमाणे तेही इथेच अडकून पडले होते.

याकाळात पोलिसांनी 196 नागरिकांना परदेशात जाण्यासाठी परवानगी दिली आहे. तर इतर जिल्ह्यात 406 नागरिकांना परवानगी दिली आहे. यात 145 नागरिक हे जर्मनी देशातले आहेत. तर,अमेरिका 43 आणि कॅनडा 2 व स्पेनचे 4 नागरिक होते. या देशातील त्यांच्या नागरिकांसाठी ऑम्बेसिकडून मुंबई विमानतळ येथे विमानसेवा सुरू केली होती. तसेच स्थानिक प्रशासनाला संपर्क करून नागरिकांना पाठविण्यास विनंती केली होती. त्यानुसार ही परवानगी दिली आहे. तर राज्यातील इतर जिल्ह्यात अत्यावश्यक कामासाठी परवानगी दिली आहे. 303 नागरिकांना जाणे आवश्यक होते.

शहरात अत्यावश्यक सेवा देणारे तसेच मेडिकलसाठी आवश्यक असल्याने बाहेर पडण्यास पोलिसांकडून पासेस देण्यात आले होते. प्रथम 14 एप्रिल परीयंत लॉकडाऊन होते. पण आता लॉकडाऊन 3 मे परियंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी देखील या पासेसची मुदत वाढविली आहे. ज्या नागरिकांना पुन्हा QR कोड मिळाला नाही त्यांनी परत परवानगीसाठी अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे.