Pune Coronavirus News : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 328 नवे पॉझिटिव्ह, 6 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑइनलान – गेल्या 24 तासात पुण्यात कोरोनाचे 328 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर शहरातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 7 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 318 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 172 क्रिटिकल रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

पुण्यात सध्या 2 हजार 903 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. आतापर्यंत कोरोनामुळं शहरातील 4 हजार 830 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकुण बाधितांची संख्या 1 लाख 98 हजार 292 वर पोहचली असून आतापर्यंत तब्बल 1 लाख 90 हजार 560 जण बरे झाले आहेत.