Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 377 नवे पॉझिटिव्ह तर 17 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 377 नवे पॉझिटिव्ह आढळले असून शहरातील 17 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 8 जणांचा आज पुण्यात कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरात आतापर्यंत कोरोनामुळं तब्बल 4 हजार 244 जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 240 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुण्यात सध्या एकुण कोरोनाबाधितांची संख्या आता 1 लाख 61 हजार 711 वर गेली आहे. सर्वात दिलासादायक गोष्ट म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 51 हजार 735 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता सध्या पुण्यात कोरोनाचे 5 हजार 732 रूग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 579 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यांच्यापैकी 335 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार दिले जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावे तसेच सोशल डिस्टेन्सिंगचे नियम पाळावेत असं प्रशासनाकडून वेळावेळी सांगण्यात आलं आहे.