Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 406 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातील कोरोना प्रादुर्भाव कमी होत असताना फेब्रुवारीमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ झाली. मागिल दोन-तीन दिवसांमध्ये पुणे शहरात पाचशेच्या वर रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची झोप उडाली. काल (रविवार) 774 रुग्ण आढळून आले होते. मात्र, आज (सोमवार) कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाल्याचे पहायला मिळत आहे. पुणे शहरात गेल्या 24 तासात 406 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 415 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (सोमवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 4 हजार 815 स्वॅब तपासणी करण्यात आली.

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 262 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज दिवसभरात सहा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन रुग्ण पुणे शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 4 हजार 859 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 4 हजार 906 इतकी आहे. शहरात आजपर्यंत 2 लाख 3 हजार 108 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 1 लाख 93 हजार 343 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 4 लाख 8 हजार 53 रुग्णांपैकी 3 लाख 88 हजार 610 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 10 हजार 295 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 148 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.24 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.24 टक्के आहे.