Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 688 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात गेल्या 24 तासात 688 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या आता 2 लाख 3 हजार 796 वर पोहचली आहे. आतापर्यंत 4 हजार 864 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 498 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 1 लाख 93 हजार 841 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज (मंगळवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 6 हजार 124 स्वॅब तपासणी करण्यात आली. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 278 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज दिवसभरात सहा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये पाच शहरातील तर एक शहराबाहेरील आहे. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 5 हजार 091 इतकी आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 4 लाख 8 हजार 918 रुग्णांपैकी 3 लाख 89 हजार 486 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 10 हजार 271 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 161 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.24 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.25 टक्के आहे.