Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 853 ‘कोरोना’ चे नवीन रुग्ण, 7 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात गेल्या 24 तासात 853 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या आता 2 लाख 4 हजार 649 वर पोहचली आहे. आतापर्यंत 4 हजार 869 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 388 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 1 लाख 94 हजार 229 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज (बुधवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 8 हजार 013 स्वॅब तपासणी करण्यात आली. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 281 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज दिवसभरात सात रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये पाच शहरातील तर दोन शहराबाहेरील आहे. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 5 हजार 551 इतकी आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 4 लाख 10 हजार 129 रुग्णांपैकी 3 लाख 90 हजार 473 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 10 हजार 490 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 166 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.23 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.21 टक्के आहे.