Coronavirus in Pune : पुण्यात गेल्या 24 तासात 904 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 7 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे शहरात गेल्या 24 तासात 904 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या आता 2 लाख 5 हजार 553 वर पोहचली आहे. आतापर्यंत 4 हजार 876 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 562 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 1 लाख 94 हजार 791 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज (गुरुवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 7 हजार 585 स्वॅब तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी 11.91 टक्के इतकी आहे. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 631 इतकी आहे. आज दिवसभरात सात रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये पाच शहरातील तर दोन शहराबाहेरील आहे. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 5 हजार 886 इतकी आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 4 लाख 11 हजार 843 रुग्णांपैकी 3 लाख 91 हजार 247 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 11 हजार 423 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 173 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.23 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.00 टक्के आहे.