Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 830 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 9 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात गेल्या 24 तासात 830 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या आता 2 लाख 6 हजार 383 वर पोहचली आहे. आतापर्यंत 4 हजार 881 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 551 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 1 लाख 95 हजार 342 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज (शुक्रवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 7 हजार 267 स्वॅब तपासणी करण्यात आली. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 300 इतकी आहे. आज दिवसभरात 9 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये पाच शहरातील तर चार शहराबाहेरील आहे. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 4 हजार 881 इतकी आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 4 लाख 13 हजार 674 रुग्णांपैकी 3 लाख 92 हजार 438 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 12 हजार 052 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 184 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.22 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 94.87 टक्के आहे.