Coronavirus in Pune : टेन्शन वाढलं ! पुण्यात गेल्या 24 तासात 963 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 9 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात गेल्या 24 तासात 963 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या आता 2 लाख 7 हजार 346 वर पोहचली आहे. आतापर्यंत 4 हजार 885 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 659 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 1 लाख 96 हजार 001 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज (शनिवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 7 हजार 609 स्वॅब तपासणी करण्यात आली. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 321 इतकी आहे. आज दिवसभरात 9 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये चार शहरातील तर पाच शहराबाहेरील आहे. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 6 हजार 460 इतकी आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 4 लाख 15 हजार 477 रुग्णांपैकी 3 लाख 93 हजार 661 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 12 हजार 622 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 194 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.21 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 94.75 टक्के आहे.