Coronavirus in Pune : पुण्यात गेल्या 24 तासात 984 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 750 जणांना डिस्चार्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात गेल्या 24 तासात 984 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या आता 2 लाख 8 हजार 330 वर पोहचली आहे. आतापर्यंत 4 हजार 890 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 750 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 1 लाख 96 हजार 751 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज (रविवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 6 हजार 743 स्वॅब तपासणी करण्यात आली. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 341 इतकी आहे. आज दिवसभरात 6 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये पाच शहरातील तर एक जण शहराबाहेरील आहे. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 6 हजार 689 इतकी आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 4 लाख 17 हजार 421 रुग्णांपैकी 3 लाख 94 हजार 896 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 13 हजार 322 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 203 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.20 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 94.60 टक्के आहे.