Coronavirus : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 1240 जण झाले कोरोनामुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पुणे शहरात गेल्या 24 तासात 1240 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात 924 नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर शहरात 22 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. पुण्यातच पण शहराबाहेरील तब्बल 18 जणांचा आज मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरात आतापर्यंत कोरोनामुळं मृत्यू होणार्‍यांची संख्या 1593 वर जावुन पोहचली आहे.

सध्या पुणे शहरात एकुण कोरोनाबाधितांची संख्या 67651 वर जावुन पोहचली आहे. सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 51353 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात 14 हजार 705 रूग्ण हे अ‍ॅक्टिव्ह आहेत. अ‍ॅक्टिव्ह असलेल्या एकुण रूग्णांपैकी 735 जण हे क्रिटिकल असून त्यापैकी 443 जण हे व्हेंटिलेटरवरून उपचार घेत आहेत.