Coronavirus in Pune : पुण्यात गेल्या 24 तासात 753 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 700 जणांना डिस्चार्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात गेल्या 24 तासात 753 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या आता 2 लाख 9 हजार 083
वर पोहचली आहे. आतापर्यंत 4 हजार 897 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 700 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 1 लाख 97 हजार 451 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज (सोमवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 6 हजार 534 स्वॅब तपासणी करण्यात आली. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी 358 रुग्ण गंभीर आहेत. तर 690 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील 7 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 6 हजार 735 इतकी आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 4 लाख 19 हजार 465 रुग्णांपैकी 3 लाख 96 हजार 244 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 14 हजार 10 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 211 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.20 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 94.46 टक्के आहे.