Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1584 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरात गेले काही दिवस कोरोनातून बर्‍या होणार्‍यांची संख्या नव्या पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येपेक्षा जास्त होती. मात्र, गेल्या 24 तासात तब्बल 1584 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दिवसभरात पुणे शहरातील 28 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे तर पुणे शहराबाहेरील 13 जणांचा आज पुण्यात मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळं मृत्यू होणार्‍यांची संख्या आता 1621 वर जावून पोहचली आहे. दरम्यान, दिवसभरात 1449 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 69235 वर जावुन पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 52802 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुणे शहरात 14812 रूग्ण हे अ‍ॅक्टिव्ह आहेत. एकुण अ‍ॅक्टिव्ह रूग्णांपैकी 735 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 445 जणांना व्हेंटिलेटरवरून उपचार दिले जात आहेत. आज कोरोनातुन बर्‍या होणार्‍या रूग्णांपैकी नव्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या जास्त असल्याने पुणेकरांची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे.