Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1691 नवे पॉझिटिव्ह तर 43 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1691 नवे पॉझिटिव्ह आढळून आले असून कोरोनामुळं दिवसभरात पुण्यातील 41 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 13 जणांचा आज पुण्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळं पुण्यात आतापर्यंत तब्बल 2875 जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 1563 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 22 हजार 448 वर जावून पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे 1 लाख 2 हजार 95 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या पुणे शहरात एकुण 17 हजार 478 रूग्ण हे अ‍ॅक्टीव्ह आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 929 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 473 रूग्ण हे व्हेंटिलेटरवरून उपचार घेत आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावे तसेच बाहेर पडल्यानंतर सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.