Coronavirus in Pune : पुण्यात ‘कोरोना’चे 4465 नवीन रुग्ण, 5634 रुग्णांना डिस्चार्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढ होत आहे. प्रशानाकडून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना केल्या जात आहे. तसेच राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. राज्यात कडक निर्बंध लागू केल्यानंतर त्याचा काहीसा परीणाम दिसू लागला आहे. पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र, मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे प्रशासनाची चिंता कायम आहे. गेल्या 24 तासात पुण्यामध्ये 4 हजार 465 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 5 हजार 634 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

पुणे शहरामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत थोडी घट झाली आहे. मात्र मृतांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. पुणे शहरात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 91 हजार 495 वर पोहचली आहे. पुणे शहरात दिवसभरात 80 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 58 रुग्ण शहरातील आहेत तर 22 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 6 हजार 388 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 3 लाख 34 हजार 782 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज (शुक्रवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 22 हजार 962 स्वॅब तपासणी करण्यात आली. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 50 हजार 325 इतकी आहे. त्यापैकी 1328 रुग्ण गंभीर आहेत, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत 7 लाख 63 हजार 194 रुग्णांपैकी 6 लाख 49 हजार 565 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 1 लाख 1 हजार 839 एवढी झाली आहे. तर जिल्ह्यात कोरोनाबाधित 11 हजार 790 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण 1.54 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 85.11 टक्के आहे.