Coronavirus in Pune : पुण्यात ‘कोरोना’चे 3260 नवीन रुग्ण, 3303 रुग्णांना डिस्चार्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला होता. मात्र मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांची संख्या घटली आहे. नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला काहींसा दिलासा मिळत आहे. रुग्ण बरे होत असताना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने चिंता कायम आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरात 3 हजार 260 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 83 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

पुणे शहरात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 लाख 36 हजार 349 वर पोहचली आहे. पुणे शहरात दिवसभरात 83 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 64 रुग्ण शहरातील आहेत तर 19 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 7 हजार 118 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 3 हजार 303 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 3 लाख 89 हजार 499 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज (बुधवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 19 हजार 790 स्वॅब तपासणी करण्यात आली. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 39 हजार 732 इतकी आहे. त्यापैकी 1415 रुग्ण गंभीर आहेत, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 8 लाख 76 हजार 461 रुग्णांपैकी 7 लाख 66 हजार 953 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 95 हजार 923 आहे. कोरोनाबाधित एकूण 13 हजार 585 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.55 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 87.51 टक्के आहे.