Coronavirus in Pune : पुण्यात गेल्या 24 तासात 2451 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 3491 जणांना डिस्चार्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. राज्यातील काही शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना पुणे शहरातील रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून घट होत आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना संक्रमित रुग्ण बरे होत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात 2 हजार 451 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 3 हजार 451 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पुणे शहरात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 लाख 41 हजार 702 वर पोहचली आहे. पुणे शहरात दिवसभरात 85 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 64 रुग्ण शहरातील आहेत तर 21 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 7 हजार 245 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 3 हजार 491 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 3 लाख 95 हजार 976 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज (शुक्रवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 16 हजार 763 स्वॅब तपासणी करण्यात आली. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 38 हजार 481 इतकी आहे. यापैकी 1411रुग्ण गंभीर आहेत, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 8 लाख 95 हजार 227 रुग्णांपैकी 7 लाख 81 हजार 539 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 99 हजार 811 आहे. कोरोनाबाधित एकूण 13 हजार 877 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.55 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 87.30 टक्के आहे.