Coronavirus in Pune : पुणेकरांना मोठा दिलासा ! गेल्या 24 तासात 6645 जण ‘कोरोना’मुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यातील अनेक शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत गेली. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर याचा मोठा ताण पडला. मात्र, मागील काही दिवसांपासून पुण्यातील संक्रमित रुग्णांच्या संख्ये वेगाने घट होताना पाहायला मिळत आहे. आज (मंगळवार) दिवसभरात नवीन रुग्णसंख्येपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यामध्ये गेल्या 24 तासात 2404 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 6645 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

पुणे शहरात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 लाख 50 हजार 133 वर पोहचली आहे. पुणे शहरात दिवसभरात 76 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 52 रुग्ण शहरातील आहेत तर 24 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 7 हजार 461 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 6 हजार 645 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 4 लाख 12 हजार 970 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज (मंगळवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 11 हजार 996 स्वॅब तपासणी करण्यात आली. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 29 हजार 702 इतकी आहे. यापैकी 1399 रुग्ण गंभीर आहेत, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 9 लाख 25 हजार 802 रुग्णांपैकी 8 लाख 19 हजार 521 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 91 हजार 873 आहे. कोरोनाबाधित एकूण 14 हजार 408 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.56 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 88.52 टक्के आहे.