Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 2219 रूग्णांची ‘कोरोना’वर मात पण दिवसभरात Covid-19 मुळं 45 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचे नवीन रूग्ण देखील मोठया प्रमाणावर आढळत असून कोरोनातून बरे होण्यार्‍यांचे प्रमाण देखील वाढले आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात पुणे शहरातील तब्बल 2219 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ते उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात कोरोनाचे 1964 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर शहरातील तब्बल 45 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 17 जणांचा आज दिवसभरात पुणे शहरात मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता कोरोनामुळं पुणे शहरात मृत्यू झालेल्यांचा आकडा 2963 वर जावून पोहचला आहे.

पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 26 हजार 532 वर जावून पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे तब्बल 1 लाख 6 हजार 197 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ते उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 17 हजार 372 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी तब्बल 939 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 479 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात येत आहे.