Coronavirus in Pune : पुण्यात गेल्या 24 तासात 1836 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 3318 जणांना डिस्चार्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पहायला मिळत आहे. राज्यातील विविध शहरांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पहायला मिळतीय. राज्यातील काही शहरांमध्ये कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यातील निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुणे शहरात रुग्णांची संख्या वेगाने वाढली. मात्र, मागील काही दिवसांपासून रुग्णांच्या संखेत घट होत असल्याचे दिसून येत आहे. शहरात दैनंदिन नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरात 1836 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 3318 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

पुणे शहरात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 लाख 56 हजार 293 वर पोहचली आहे. पुणे शहरात दिवसभरात 72 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 48 रुग्ण शहरातील आहेत तर 24 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 7 हजार 611 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 3 हजार 318 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 4 लाख 24 हजार 990 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज (शुक्रवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 13 हजार 908 स्वॅब तपासणी करण्यात आली. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 23 हजार 692 इतकी आहे. यापैकी 1381 रुग्ण गंभीर आहेत, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 9 लाख 52 हजार 413 रुग्णांपैकी 8 लाख 48 हजार 364 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 89 हजार 220 आहे. कोरोनाबाधित एकूण 14 हजार 829 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.56 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 89.08 टक्के आहे.