Coronavirus in Pune : पुण्यात गेल्या 24 तासात 2985 रूग्ण ‘कोरोना’मुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्यात कडक निर्बंध लागू केले आहे. याचा परिणाम होत असून पुण्यातील रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यातील नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने पुणेकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात शहरात 1317 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 73 रुग्णांचा उपचारादम्यान मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 लाख 59 हजार 303 वर पोहचली आहे. पुणे शहरात दिवसभरात 73 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 48 रुग्ण शहरातील आहेत तर 26 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 7 हजार 706 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 2 हजार 985 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 4 लाख 31 हजार 008 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज (रविवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 11 हजार 553 स्वॅब तपासणी करण्यात आली. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 20 हजार 589 इतकी आहे. यापैकी 1415 रुग्ण गंभीर आहेत, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 9 लाख 64 हजार 119 रुग्णांपैकी 8 लाख 66 हजार 389 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 82 हजार 621 आहे. कोरोनाबाधित एकूण 15 हजार 109 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.57 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 89.86 टक्के आहे.