Coronavirus in Pune : पुणे शहरात दिवसभरात ‘कोरोना’चे 1164 नवीन रुग्ण, 2407 रुग्णांना डिस्चार्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोना व्हायरसचे संक्रमण मोठ्या प्रमाणात झाले आहे. कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनचा परिणाम होताना दिसून येत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्णांच्या संख्येत वेगाने घट होत आहे. पुणे शहरात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा वाढता आलेख खाली येताना दिसत आहे. गेल्या 24 तासात नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. पुण्यामध्ये गेल्या 24 तासात 1164 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 2407 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 लाख 62 हजार 172 वर पोहचली आहे. पुणे शहरात दिवसभरात 72 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 48 रुग्ण शहरातील आहेत तर 24 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 7 हजार 843 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 2 हजार 407 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 4 लाख 39 हजार 097 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 10 हजार 806 स्वॅब तपासणी करण्यात आली. आजपर्यंत शहरात 23 लाख 92 हजार 098 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 15 हजार 232 इतकी आहे. यापैकी 1348 रुग्ण गंभीर आहे. तर 4754 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 9 लाख 76 हजार 429 रुग्णांपैकी 8 लाख 93 हजार 676 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 67 हजार 296 आहे. कोरोनाबाधित एकूण 15 हजार 457 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.58 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 91.52 टक्के आहे.