Coronavirus in Pune : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 2496 रूग्ण ‘कोरोना’मुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पुणे शहरामध्ये मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या संख्येत घट पहायला मिळत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण काही प्रमाणात कमी झाली आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडाऊनचा परिणाम होताना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात 2 हजार 496 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

पुणे शहरात गेल्या 24 तासात 973 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. शहरात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 लाख 64 हजार 073 वर पोहचली आहे. पुणे शहरात दिवसभरात शहरातील 41 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 7 हजार 928 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 4 लाख 42 हजार 669 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 11 हजार 676 स्वॅब तपासणी करण्यात आली. शहरात आजपर्यत 24 लाख 16 हजार प्रयोशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 13 हजार 479 इतकी आहे. यापैकी 1315 रुग्ण गंभीर आहेत. तर 4279 रुग्णांवर ऑक्सिजनद्वारे उपचार सुरु आहेत, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 9 लाख 84 हजार 787 रुग्णांपैकी 9 लाख 6 हजार 245 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 62 हजार 877 आहे. कोरोनाबाधित एकूण 15 हजार 665 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.59 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 92.02 टक्के आहे.