Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’मुळं 29 जणांचा मृत्यू, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनामुळं शहरातील 29 जणांचा मृत्यू झाला आहे. शहराबाहेरील 6 जणांचा आज पुण्यात झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांची संख्या आता 1739 वर पोहचली आहे. दरम्यान, दिवसभरात कोरोनाचे 1522 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहे तर तब्बल 1412 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आता सध्या एकुण कोरोनाबाधितांचा आकडो 74098 वर जावून पोहचला आहे. सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 57657 जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात एकुण 14702 अ‍ॅक्टिव्ह रूग्ण आहेत. एकुण अ‍ॅक्टिव्ह रूग्णांपैकी 760 रूग्ण हे क्रिटिकल आहेत. त्यापैकी 462 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. स्थानिक प्रशासननं नागरिकांना मास्क परिधान करण्याचं तसेच सोशल डिस्टेन्सिंगचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.