Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1891 नवे पॉझिटिव्ह तर 44 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, गेल्या 24 तासात पुण्यात कोरोनाचे 1891 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहे तर दिवसभरात पुणे शहरात तब्बल 44 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 17 जणांचा आज पुणे शहरात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरात आतापर्यंत कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांचा आकडा 3007 पर्यंत गेला आहे. दिवसभरातील सर्वात समाधानाची बाब म्हणजे तब्बल 1926 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ते उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज दिला आहे.

सध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 28 हजार 423 वर जावून पोहचली आहे. सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 8 हजार 123 रूग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 17 हजार 293 रूग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 961 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 493 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगचा वापर करावा असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात आलं आहे.