Coronavirus in Pune : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 921 रूग्ण ‘कोरोना’मुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाच्या(Corona) दुसऱ्या लाटे मोठ्या प्रमाणत रुग्णांची वाढ झाली. मागील काही दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना(Corona) बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे पहायला मिळत. नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. रुग्ण बरे होत असल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. पुणे शहरात गेल्या 24 तासात 588 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

पुणे शहरात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 लाख 68 हजार 129 वर पोहचली आहे. पुणे शहरात दिवसभरात 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 22 रुग्ण शहरातील आहेत तर 11 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 8 हजार 148 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 921 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 4 लाख 51 हजार 991 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 8 हजार 193 स्वॅब तपासणी करण्यात आली. आतापर्यंत शहरामध्ये 24 लाख 68 हजार 709 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 7 हजार 990 इतकी आहे. यापैकी 996 रुग्ण गंभीर आहे. तर 1862 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 3 हजार 329 रुग्णांपैकी 9 लाख 51 हजार 718 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 35 हजार 231 आहे. कोरोनाबाधित एकूण 16 हजार 380 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.63 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 94.86 टक्के आहे.

दुर्देवी ! दुचाकींच्या धडकेत मायलेकाचा जागीच मृत्यू, नाशिक जिल्ह्यातील घटना

मल्टीविटामिनने भरलेल्या शेवग्याच्या भाजीचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे; Drumstick चे फुलं, पानं अन् साल देखील खुपच फायद्याची, जाणून घ्या

Pune : मंगलदास बांदल यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला, सुनावली 4 दिवसांची पोलीस कोठडी; जाणून घ्या कोर्टात काय झालं

सर्दी-तापाचा Virus करू शकतो कोरोनावर मात, वैज्ञानिकांचा दावा

Pune : Covid-19 नियमांचे उल्लंघन ! माजी मंत्री रमेश बागवे यांच्या मुलाच्या हॉटेलवर कोंढवा पोलिसांची मध्यरात्री कारवाई, 22 जणांवर FIR