Coronavirus in Pune : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 999 रूग्ण ‘कोरोना’मुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे शहरात कोरोनाचा(corona) संसर्ग कमी झाला आहे. मागील दोन महिन्यात पुण्यामध्ये कोरोना(corona) बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढली होती. मात्र, आता नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याने शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 573 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.

पुण्यातील Lockdown बाबत मोठा निर्णय ! आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडून घोषणा

पुणे शहरात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 लाख 68 हजार 702 वर पोहचली आहे. पुणे शहरात दिवसभरात 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 29 रुग्ण शहरातील आहेत तर 12 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 8 हजार 177 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 999 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 4 लाख 52 हजार 990 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 8 हजार 200 स्वॅब तपासणी करण्यात आली. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 7 हजार 535 इतकी आहे. यापैकी 981 रुग्ण गंभीर आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

खुशखबर ! शेतकर्‍यांना मिळणार 4000 रुपये; 30 जूनच्या पूर्वी येथे करावा लागेल अर्ज, जाणून घ्या पूर्ण डिटेल

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 5 हजार 646 रुग्णांपैकी 9 लाख 56 हजार 857 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 32 हजार 289 आहे. कोरोनाबाधित एकूण 16 हजार 500 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.64 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.15 टक्के आहे.

BMC Election 2021 : निवडणूक पुढे ढकलली जाणार ? केंद्रीय निवडणूक आयोगाची अधिकाऱ्यांसोबत बैठक, लवकरच होणार निर्णय

आमदार गोपीचंद पडळकरांचा इशारा, म्हणाले – ’31 मेपासून पुन्हा एकदा धनगर आरक्षणाचा लढा उभारणार’ 

खासदार संभाजीराजे लवकरच देणार भाजपला सोडचिठ्ठी? नवा पक्ष स्थापन करणार?, सोशल मीडियावर कॅम्पेन सुरु 

‘शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते तेव्हा काय केलं ?’, पवार-संभजीराजेंच्या भेटीवरुन खा. नारायण राणेंचा सवाल