Coronavirus in Pune : मोठा दिलासा ! पुण्यात दुसर्‍या लाटेतील सर्वात ‘निच्चांकी’ रूग्णसंख्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे शहरात कोरोनाचा(corona) संसर्ग कमी झाला आहे. मागील दोन महिन्यात पुण्यामध्ये कोरोना(corona) बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढली होती. मात्र, आता नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या घटली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 180 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.

Maharashtra Weather : राज्यात पूर्व मोसमी पावसाचा तडाखा सुरुच, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात कोसळणार धारा

पुणे शहरात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 लाख 69 हजार 927 वर पोहचली आहे. पुणे शहरात दिवसभरात 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 24 रुग्ण शहरातील आहेत तर 09 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 8 हजार 256 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 751 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 4 लाख 55 हजार 561 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Pune : व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास त्वरित परवानगी द्यावी – पुणे व्यापारी महासंघ

आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 4 हजार 439 स्वॅब तपासणी करण्यात आली. आजपर्यंत 24 लाख 96 हजार 737 चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 6 हजार 020 इतकी आहे. यापैकी 844 रुग्ण गंभीर आहेत. तर 1581 जण ऑक्सिजनवर आहेत, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Coronavirus Vaccine : वेळेवर ‘व्हॅक्सीन’ टोचून घ्या अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान, जाणून घ्या कसे

Ajit Pawar on Corona Vaccination : ‘लसीकरण वेगानं पूर्ण करण्याचा प्रयत्न, परदेशातूनही लस खरेदीची सरकारची तयारी’

Chest Physiotherapy : श्वास घेण्यास त्रास होत असेल तर चेस्ट फिजियोथेरेपी करा, जाणून घ्या पद्धत आणि फायदे