Coronavirus in Pune : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 858 रूग्ण ‘कोरोना’मुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही महिन्यांपासून पुणे शहरात कोरोना Coronavirus बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. मात्र, मागील काही दिवसांपासून शहरातील रुग्णांची संख्या कमी होत आहे. रुग्ण संख्या कमी होत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. पुणे शहरात दैनंदिन रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 384 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.

BMC Elections : ‘…अन्यथा महापालिका निवडणुका पुढे ढकलल्या जातील’ – महापौर किशोरी पेडणेकर

पुणे शहरात आतापर्यंत कोरोना Coronavirus बाधित रुग्णांची संख्या 4 लाख 70 हजार 311 वर पोहचली आहे. पुणे शहरात दिवसभरात 39 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 28 रुग्ण शहरातील आहेत तर 11 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 8 हजार 284 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 858 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 4 लाख 56 हजार 506 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 5 हजार 964 स्वॅब तपासणी करण्यात आली. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 5 हजार 518 इतकी आहे. यापैकी 784 रुग्ण गंभीर आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 13 हजार 804 रुग्णांपैकी 9 लाख 70 हजार 162 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 26 हजार 867 आहे. कोरोनाबाधित एकूण 16 हजार 775 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.65 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.70 टक्के आहे.

READ ALSO THIS :

खुशखबर ! 18 ते 40 वर्षे वयोगटातील 10 वी पास उमेदवारांना पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात नोकरीची सुवर्णसंधी, मुलाखतीविना 2428 पदांसाठी भरती; जाणून घ्या प्रक्रिया

 

लाल, गोड टरबूज ओळखण्याच्या अनोख्या युक्त्या; तात्काळ समजेल फळाच्या आतमधील परिस्थितीबाबत, जाणून घ्या

2013 च्या पोलीस उपनिरीक्षक अहर्ता परिक्षेतील 619 अंमलदारांना PSI पदी बढती

 

सकाळी उठल्यानंतर दररोज बडीशेपचे पाणी प्या, नक्की वजन होईल कमी; जाणून घ्या पाणी पिण्याची पध्दत