Coronavirus in Pune : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 515 रूग्ण ‘कोरोना’मुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा Pune Coronavirus प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. परंतु मृत्यूची संख्या कमी होत नसल्याने चिंता कायम आहे. पुणे शहरामध्ये मागील काही दिवसांपासून रुग्णांची संख्या पाचशेच्या आत आली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. पुणे शहरात Pune Coronavirus गेल्या 24 तासात 450 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.

शहरात आतापर्यंत कोरोना Coronavirus बाधित रुग्णांची संख्या 4 लाख 71 हजार 228 वर पोहचली आहे. पुणे शहरात दिवसभरात 39 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 27 रुग्ण शहरातील आहेत तर 12 रुग्ण शहराबाहेरील आहेत.

…म्हणून बहिणीनं सख्ख्या भावासोबत केलं लग्न

आतापर्यंत 8 हजार 340 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 515 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आजपर्यंत 4 लाख 57 हजार 675 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 8 हजार 166 स्वॅब तपासणी करण्यात आली. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 5 हजार 213 इतकी आहे.

 यापैकी 742 रुग्ण गंभीर आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 17 हजार 164 रुग्णांपैकी 9 लाख 76 हजार 835 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.

ॲक्टिव्ह रुग्ण 23 हजार 437 आहे. कोरोनाबाधित एकूण 16 हजार 892 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मृत्यूचे प्रमाण 1.66 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 96.04 टक्के आहे.

 

Pune : दोनशे नागरिकांची 7 कोटी 14 लाख रुपयांची फसवणूक ! धनकवडीतील आदर्शनागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका व अध्यक्षा सुनीता नाईक यांना अटक, 5 दिवस पोलीस कोठडी

 

घरबसल्या ‘ओम’च्या जापाबरोबरच करा हा व्यायाम, फुफ्फुसांमध्ये येईल मजबुती; जाणून घ्या

 

Pune Metro Project : कामगार पुतळा झोपडपट्टी पुनर्वसनाची प्रक्रिया 4 ते 8 जून दरम्यान पुर्ण करणार; नवीन सदनिका नोंदणीसाठी उपस्थित न राहाणार्‍या पात्र झोपडीधारकाचा हक्क संपुष्टात येणार – राजेंद्र निंबाळकर (सीईओ, एसआरए)

 

गुळ आणि हरभरा खाण्याचे जबरदस्त फायदे, महिलांनी आवश्य करावं ‘सेवन’

 

तुमचे आरोग्य उत्तम ठेवतो ‘आर्टिस्टिक योगा’