Coronavirus in Pune : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 641 रूग्ण ‘कोरोना’मुक्त

पुणे  : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात कोरोनाचा (corona ) संसर्ग कमी झाला आहे. मागील दोन महिन्यात पुण्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढली होती. मात्र, आता नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याने शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये  (Pune City) 380 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारासह 10 जिल्ह्यांचा तिसर्‍या टप्प्यात समावेश, ‘या’ पध्दतीची असणार नियमावली, जाणून घ्या

गेल्या 24 तासात 18 रुग्णांचा मृत्यू
पुणे शहरात (Pune City) आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 लाख 71 हजार 957 वर पोहचली आहे. पुणे शहरात दिवसभरात 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 18 रुग्ण शहरातील आहेत तर 10 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 8 हजार 379 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Medical Exam : वैद्यकीय परीक्षा ऑफलाईनच ! परीक्षार्थ्यांना RT-PCR टेस्ट निगेटिव्ह असणं बंधनकारक

सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट
दरम्यान 641 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
आजपर्यंत 4 लाख 59 हजार 015 रुग्ण कोरोनामुक्त (Recover) झाले आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 6 हजार 909 स्वॅब तपासणी करण्यात आली.
शहरात सक्रिय रुग्ण संख्या 4 हजार 563 इतकी आहे.
यापैकी 709 रुग्ण गंभीर आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पुणे जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.42 %
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 20 हजार 496 रुग्णांपैकी 9 लाख 83 हजार 937 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.
ॲक्टिव्ह रुग्ण 19 हजार 561 आहे.
कोरोनाबाधित एकूण 16 हजार 998 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मृत्यूचे प्रमाण 1.67 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 96.42 टक्के आहे.

READ ALSO THIS :

 

तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क !

 

मराठा आरक्षण रद्द होण्यामागे ‘हे’ दोन प्रमुख कायदेशीर मुद्दे; जाणून घ्या

 

दोन सख्ख्या बहिणींची गळफास घेऊन आत्महत्या, प्रचंड खळबळ

 

25 वर्षांच्या हलीमाने एकाचवेळी दिला होता 9 मुलांना जन्म; एक महिन्यानंतर ‘ही’ आहे स्थिती