Coronavirus in Pune : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 549 रूग्ण ‘कोरोना’मुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात कोरोनाची coronavirus दुसरी लाट ओसरत असल्याचे पहायला मिळत आहे. नवीन रुग्णांपेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. रुग्ण् बरे होत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 50 हजारांच्यावर गेली होती. परंतु सध्या सक्रिय रुग्णांची संख्या पाच हजाराच्या आत आली आहे. पुणे शहरात सध्या 4 हजार 295 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पुणे शहरात गेल्या 24 तासात 297 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना coronavirus बाधित रुग्णांची संख्या 4 लाख 72 हजार 254 वर पोहचली आहे. पुणे शहरात दिवसभरात 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 16 रुग्ण शहरातील आहेत तर 09 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 8 हजार 395 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यात 662 रुग्ण गंभीर
दरम्यान 549 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 4 लाख 59 हजार 564 रुग्ण कोरोनामुक्त coronavirus झाले आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 5 हजार 868 स्वॅब तपासणी करण्यात आली. शहरातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 662 रुग्ण गंभीर आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पुणे जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.47 %
पुणे जिल्ह्यातील कोरोना coronavirus बाधीत एकूण 10 लाख 22 हजार 51 रुग्णांपैकी 9 लाख 85 हजार 949 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 19 हजार 59 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 हजार 43 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.67 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 96.47 टक्के आहे.

Also Read This : 

Pune News : तळेगाव ढमढेरे येथे दिवसाढवळ्या खून, प्रचंड खळबळ

घरबसल्या ‘ओम’च्या जापाबरोबरच करा हा व्यायाम, फुफ्फुसांमध्ये येईल मजबुती; जाणून घ्या

भाजप कार्यालयाजवळ 51 क्रुड बॉम्ब आढळल्याने खळबळ !

केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात, तर कोरोना संक्रमणापासून दूर रहा; जाणून घ्या कारण?

प्रियकराने सैन्यात भरती होताच दिला धोका, लग्नाला नकार देताच तरुणीने काढली ‘वरात’

मोदी सरकार नवीन कामगार कायदे लागू करण्याच्या तयारीत? कर्मचाऱ्यांची इन-हँड-सॅलरी कमी होणार, PF वर होणार परिणाम

Pune Crime News : शारीरिक संबंधाच्या बहाण्याने मिळवला व्हॉट्सअ‍ॅप नंबर, नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करुन केले ब्लॅकमेल, उकळलले पैसे