Coronavirus in Pune : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 514 रूग्ण ‘कोरोना’मुक्त, नवीन रुग्णांची संख्या दोनशेच्या आत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाची Coronavirus दुसरी लाट आटोक्यात येत आहे. मध्यंतरीच्या काळात कोरोना Coronavirus बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढली. परंतु आता रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. रुग्णांची संख्या दोनशेच्या आत आल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. रुग्णांच्या तुलनेत रुग्ण बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. यामुळे सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या 24 तासात शहरात 177 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 514 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

पुणे शहरात गेल्या 24 तासात 177 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

त्यामुळे कोरोना Coronavirus बाधित रुग्णांची संख्या 4 लाख 72 हजार 431 वर पोहचली आहे.

पुणे शहरात दिवसभरात 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

यामध्ये 15 रुग्ण शहरातील आहेत तर 11 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 8 हजार 943 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यात 625 रुग्ण गंभीर

दरम्यान 514 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आजपर्यंत 4 लाख 60 हजार 078 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 4 हजार 775 स्वॅब तपासणी करण्यात आली.

शहरातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 625 रुग्ण गंभीर आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पुणे जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.57 %

पुणे जिल्ह्यातील कोरोना Coronavirus बाधीत एकूण 10 लाख 23 हजार 440 रुग्णांपैकी 9 लाख 88 हजार 299 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.

ॲक्टिव्ह रुग्ण 18 हजार 62 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 हजार 79 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मृत्यूचे प्रमाण 1.67 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 96.57 टक्के आहे.

Also Read This : 

 

Pune Fire News | पुण्यालगतच्या सॅनिटायझर तयार करणार्‍या कंपनीला लागलेल्या आगीत 15 होरपळून जणांचा मृत्यू; आगीचं कारण आलं समोर

 

पुस्तक वाचल्याने केवळ आपले ज्ञान वाढणार नाही तर आरोग्यासही होतील आश्चर्यकारक फायदे; जाणून घ्या

 

 

शॉम्पू केल्याच्या दुसर्‍याच दिवशी केस तेलकट होतात? ‘हे’ घरगुती उपाय येतील तुमच्या कामाला, जाणून घ्या

 

चिंताजनक ! पवित्र इंद्रायणी पुन्हा फेसाळली, आळंदी आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका