Coronavirus in Pune : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 529 रूग्ण ‘कोरोना’मुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात कोरोना (Coronavirus) बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने घट होत आहे. मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या पाचशेच्या आत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच शहरातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरात 297 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

6 कोटी PF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी ! EPFO कडून महत्वाच्या नियमात बदल, जाणून घ्या अन्यथा नाही मिळणार पैसे

पुणे शहरात गेल्या 24 तासात 297 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे कोरोना (Coronavirus) बाधित रुग्णांची संख्या 4 लाख 72 हजार 728 वर पोहचली आहे.
पुणे शहरात दिवसभरात 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये 12 रुग्ण शहरातील आहेत तर 12 रुग्ण शहराबाहेरील आहेत.
आतापर्यंत 8 हजार 422 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरात 3 हजार 699 रुग्ण सक्रीय आहेत.

पुण्यात 529 रुग्ण गंभीर
दरम्यान 529 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
आजपर्यंत 4 लाख 60 हजार 607 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 5 हजार 052 स्वॅब तपासणी करण्यात आली.
आज पर्यंत शहरात 25 लाख 48 हजार 825 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहरातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 589 रुग्ण गंभीर आहेत. तर 1178 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पुणे जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.66 %
पुणे जिल्ह्यातील कोरोना (Coronavirus) बाधीत एकूण 10 लाख 24 हजार 277 रुग्णांपैकी 9 लाख 90 हजार 18 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 17 हजार 143 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 हजार 116 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.67 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 96.66 टक्के आहे.

Also Read This : 

Mercedes-Maybach GLS 600 भारतात झाली लाँच, अवघ्या 4.9 सेकंदमध्ये पकडते 100 kmph चा वेग

Pune News | फी साठी विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करा – युवक क्रांती दल

मर्सिडीजने सादर केली सर्वात शानदार कार, किंमत 2.60 कोटी रुपये