Pune Corona : पुणे शहरात गेल्या 24 तासात 456 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, तर 311 नवीन रुग्णांची नोंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे शहरात (Pune City) गेल्या 24 तासात 311 कोरोना बाधित रुग्णांचे (Corona infected patients) निदान झाले आहे. तर 456 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या तीन हजार पाचशेवर आली आहे. सध्या शहरामध्ये 3 हजार 539 इतके कोरोना व्हायरस (pune coronavirus) सक्रीय रुग्ण आहेत. त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मध्यंतरीच्या काळात वाढलेली कोरोना व्हायरस (pune coronavirus) रुग्ण संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे पुणे शहरातील जनजीवन सुरळीत होत आहे.

स्पर्म काऊंट वाढवतात ‘हे’ 8 फूड, ‘या’ 5 वस्तूंपासून पुरुषांनी दूर राहण्याची आवश्यकता

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 47 हजार 039 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona infected patients) आढळून आले आहे.
त्यापैकी 4 लाख 61 हजार 063 इतके रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये शहरातील 15 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 08 रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत पुणे शहरात 8437 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 6758 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
यामध्ये 563 रुग्ण गंभीर आहेत तर 1049 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पुणे जिल्ह्यात रुग्ण (Patients in Pune district) बरे होण्याचे प्रमाण वाढले

पुणे जिल्ह्यातील कोरोना (corona) बाधीत एकूण 10 लाख 25 हजार 448 रुग्णांपैकी 9 लाख 92 हजार 471 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.
ॲक्टिव्ह रुग्ण (Active patient) 15 हजार 826 आहे.
कोरोनाबाधित एकूण 17 हजार 151 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मृत्यूचे प्रमाण 1.67 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 96.78 टक्के आहे.

Vedika Shinde Latest News | वेदिका शिंदेच्या 16 कोटींच्या इंजेक्शनवरील आयात शुल्क होणार माफ
आयटी प्रोफेशनल्ससाठी मोठी बातमी ! नव्या नोकरीत 40 % वेतनवाढीचा अंदाज

बारामती MIDC मध्ये सुरु असलेल्या सेक्स ‘रॅकेट’चा पर्दाफाश, प्रचंड खळबळ

Signs Before Kidney Failure | किडनी फेल होण्यापुर्वी शरीर देतं ‘हे’ संकेत, नजर अंदाज नका करू; जाणून घ्या

Web Title : pune coronavirus news updates today