Pune Coronavirus | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 252 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Coronavirus) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या अडीचशेच्या आत आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या अडीच हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 165 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 252 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.(pune coronavirus news updates today)

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 96 हजार 937 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 85 हजार 817 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 04 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 12 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8953 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यात 2167 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

पुणे शहरामध्ये सध्या 2167 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 211 रुग्ण गंभीर आहेत. तर 292 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 6097 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत 31 लाख 86 हजार 140 तपासणी करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

पुणे जिल्ह्यातील रिकव्हरी रेट 97.46 %

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 11 लाख 20 हजार 194 रुग्णांपैकी 10 लाख 91 हजार 762 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 9 हजार 803 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 629 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.66 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 97.46 टक्के आहे.

 

Web Title : pune coronavirus news updates today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | बनावट गुटखा तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा; 12 लाखांचा मुद्देमाल जप्त

Kalyan Crime | धक्कादायक ! कल्याणमध्ये भरदिवसा विवाहितेची दगडाने ठेचून हत्या

Bluetooth Security | ALERT ! अँड्रॉईड फोन आणि विंडोज 10 यूजर्सला मोठा धोका! समोर आला नवीन प्रकारचा धोकादायक व्हायरस