Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोनो’चे 1364 नवे पॉझिटिव्ह तर 46 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे तसेच रूग्ण बरे होण्याच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे. दरम्यान, पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1364 नवे पॉझिटिव्ह आढळून आले असून दिवसभरात पुणे शहरातील 46 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 14 जणांचा आज पुण्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळं पुणे शहरात मृत्यू झालेल्यांची संख्या 3167 वर जाऊन पोहचली आहे. दिवसभरातील समाधानाची बाब म्हणजे तब्बल 1614 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 34 हजार 29 वर जाऊन पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 13 हजार 786 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 17 हजार 76 रूग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी तब्बल 957 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 492 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगचे नियम पाळावेत असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात आलं आहे.