Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1764 नवे पॉझिटिव्ह तर 26 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरात कोरोनाचे 1764 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर पुणे शहरातील 26 जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुण्याच्या बाहेरील 22 रूग्णांचा आज दिवसभरात पुणे शहरात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरात आतापर्यंत कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांची संख्या 2401 वर जावुन पोहचली आहे. दरम्यान, दिवसभरात 1188 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 459 वर जावून पोहचली आहे. त्यामध्ये समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत 82085 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या पुणे शहरात 15 हजार 973 रूग्ण हे अ‍ॅक्टीव्ह आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 885 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 530 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगचे नियम पाळावेत असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात आलं आहे.