Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1789 नवे पॉझिटिव्ह तर 46 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्र आणि राज्य सरकार व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1789 नवे पॉझिटिव्ह आढळले असून दिवसभरात पुणे शहरातील 46 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 15 जणांचा आज पुणे शहरात मृत्यू झाला. त्यामुळे पुणे शहरात आतापर्यंत कोरोनामुळं 3213 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरातील समाधानाची बाब म्हणजे 1512 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 35 हजार 818 वर जाऊन पोहचली आहे. समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 15 हजार 298 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 17 हजार 308 रूग्ण हे अ‍ॅक्टीव्ह आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 952 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 496 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावे तसेच सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात येत आहे.