Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1512 नवे पॉझिटिव्ह तर 42 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरात कोरोनाचे 1512 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर कोरोनामुळं पुण्यातील 42 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 18 जणांचा पुणे शहरात आज दिवसभरात कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरात कोरोनामुळं आतापर्यंत 3255 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, समाधानाची बाब म्हणजे आज दिवसभरात 1328 रूग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 37 हजार 330 वर जाऊन पोहचली आहे. सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 16 हजार 626 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 17 हजार 449 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 957 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 499 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात आलं आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like