Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 779 नवे पॉझिटिव्ह तर 33 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न करण्यात येत आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 779 नवे पॉझिटिव्ह आढळले असून शहरातील 33 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 19 जणांचा आज पुणे शहरात मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळं (Coronavirus) पुणे (Pune) शहरात आतापर्यंत तब्बल 3406 जणांचा मृत्यू झाला आहे. आजची समाधानाची बाब म्हणजे आज तब्बल 1105 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 42 हजार 915 वर जाऊन पोहचली आहे. त्यामध्ये समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 22 हजार 281 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 17 हजार 228 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. एकूण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 943 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 520 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार दिले जात आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमाचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात आलं आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like