Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1548 नवे पॉझिटिव्ह तर 41 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसमुळं मृत्यू होण्याचं प्रमाण वाढत असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1548 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहे तर पुणे शहरातील 41 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 17 जणांचा दिवसभरात पुणे शहरात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरात आतापर्यंत कोरोनामुळं तब्बल 3373 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरातील समाधानाची बाब म्हणजे तब्बल 1599 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 42 हजार 136 वर जाऊन पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात महत्वाची आणि समाधानाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 21 हजार 176 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 17 हजार 587 रूग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 940 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 520 रूग्णांवर व्हेंटिलेटरवरून उपचार चालू आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमांचा वापर करावा असं आवाहन स्थानिक प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात आलं आहे.