Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1781 नवे पॉझिटिव्ह तर 40 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा पुणे शहरात वाढत असल्याचे गेल्या 3 दिवसांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात पुणे शहरात कोरोनाचे तब्बल 1781 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर पुणे शहरातील तब्बल 40 जणांचा आज दिवसभरात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणेकरांची चिंता पुन्हा वाढली आहे. आजची समाधानाची बाब म्हणजे दिवसभरात 1578 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे शहरात आतापर्यंत कोरोनामुळं तब्बल 2168 जणांचा मृत्यू झाला आहे.

सध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या ही 90871 वर जावून पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 73527 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 15158 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 827 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यांच्यापैकी तब्बल 498 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. गेल्या 3 दिवसांमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पुणे शहरात वाढत असल्याचं समोर आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे.