Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1040 नवे पॉझिटिव्ह तर 40 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच स्तरातून युध्दपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. गेल्या 24 तासात पुणे शहरात कोरोनाचे 1040 नवे पॉझिटिव्ह आढळून आले असून कोरोनामुळं शहरातील 40 जणांचा आज मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 21 जणांचा आज पुणे शहरात कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत पुणे शहरात कोरोनामुळं 3446 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वात समाधानाची बाब म्हणजे आज दिवसभरात तब्बल 1 हजार 548 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 43 हजार 955 वर गेली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 23 हजार 929 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 16 हजार 680 रूग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 938 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 419 जणांना व्हेंटिलेटरवरून उपचार दिले जात आहेत. कोरोनातून बर्‍या होणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, काही प्रमाणात कोरोनाचे नवे पॉझिटिव्ह देखील आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात आलं आहे.