Coronavirus : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 1822 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसविरूध्द लढण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. दरम्यान, पुण्याच्या स्थानिक प्रशासनानं देखील कंबर कसली असून प्रशासनातील सर्वजण 24 तास कार्यरत आहेत. दरम्यान, गेल्या 24 तासात पुणे शहरातील तब्बल 1822 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात 781 नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून 18 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. पुणे शहरात आज पुण्याबाहेरील 5 जणांचा देखील मृत्यू नोंदविण्यात आला आहे. आतापर्यंत पुणे शहरात कोरोनामुळं 1384 जणांचा मृत्यू झाला आहे.


सध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या ही 58304 वर जावून पोहचली आहे. समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 39939 जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात 16981 अ‍ॅक्टिव्ह रूग्ण आहेत. सध्या अ‍ॅक्टिव्ह असलेल्या रूग्णांपैकी 633 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 389 जणांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. आज दिवसभरात 1822 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. प्रशासनानं नागरिकांना घराबाहेर पडताना मास्क परिधान करण्याचं तसेच सोशल डिस्टेन्सिंगचे नियम पाळण्याबाबतचं आवाहन केलं आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like