Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 418 नवे पॉझिटिव्ह तर 23 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक प्रशासन देखील दिवस-रात्र प्रयत्नशील आहे. पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 418 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर दिवसभरात शहरातील 23 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 6 जणांचा आज पुण्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळं तब्बल 3 हजार 964 जणांचा मृत्यू झाला आहे. आजची समाधानाची बाब म्हणजे दिवसभरात 860 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले आहेत.

सध्या पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 57 हजार 51 वर पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 43 हजार 229 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 9 हजार 858 रूग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 827 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 441 जणांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क परिधान करावे तसेच सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात येतं आहे.