Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 369 नवे पॉझिटिव्ह तर 21 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 369 नवे पॉझिटिव्ह आढळले आहेत तर दिवसभरात कोरोनामुळं 21 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 10 जणांचा आज पुण्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळं पुणे शहरात आतापर्यंत कोरोनामुळं मृत्यू झालेल्याची संख्या आता 4066 वर गेली आहे. आजची समाधानाची बाब म्हणजे दिवसभरात 818 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 58 हजार 756 एवढी आहेत. त्यामध्ये सर्वात दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 46 हजार 912 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात अ‍ॅक्टीव्ह रूग्णांची संख्या 7 हजार 778 एवढी आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 708 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 384 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत.