Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 292 नवे पॉझिटिव्ह तर 17 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आता पुणे शहरात कमी होत असताना आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे 292 नवे पॉझिटिव्ह आढळून आले असून आहेत तर शहरातील 17 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 4 जणांचा आज पुण्यात कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. त्यामुळं पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळं तब्बल 4 हजार 122 जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 454 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुण्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या आता 1 लाख 59 हजार 698 वर जाऊन पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 48 हजार 870 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 6 हजार 706 रूग्ण हे अ‍ॅक्टीव्ह आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 668 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 305 जणांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत.

You might also like