Coronavirus : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 1428 जणांचा ‘कोरोना’वर मात, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न चालू आहेत. कोरोनातून बर्‍या होणार्‍यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. गेल्या 24 तासात कोरोनातून तब्बल 1428 जण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, दिवसभरात कोरोनाचे 993 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर पुणे शहरातील 38 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 17 जणांचा आज पुण्यात मृत्यू झाला आहे.

सध्या पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 49 हजार 399 एवढी आहे. सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 30 हजार 353 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरातील कोरोनाच्या अ‍ॅक्टीव्ह रूग्णांची संख्या 15 हजार 399 आहे. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 899 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 504 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगचे नियम पाळावेत असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात आलं आहे.