Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 147 नवे पॉझिटिव्ह तर 19 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सध्या कमी होत असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 147 नवे पॉझिटिव्ह आढळून आले असून दिवसभरात शहरातील 19 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 13 जणांचा आज पुण्यात कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. त्यामुळं पुण्यात आतापर्यंत कोरोनाने 4141 जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरातील समाधानाची बाब म्हणजे 410 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 59 हजार 945 वर जाऊन पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची आणि दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 49 हजार 280 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 6 हजार 424 रूग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 639 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 356 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत.

You might also like